कामगारांवरील कारवाया थांबवण्यासाठी एक्साईड इंडस्ट्रीजमधील कामगारांचा एल्गार!

0
297

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – एक्साईड इंडस्ट्रिज लिमिटेड, चिंचवड या कंपनीमधील सर्व कामगारांनी दिनांक 14/05/2022 रोजी माजी उद्योगमंत्री, कामगार नेते आणि विद्यमान विधान परिषद आमदार श्री. सचिनभाऊ अहिर यांच्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ या संघटनेचे सभासदत्व स्वीकारले. पूर्वीच्या युनियनने कामगारांकडे दुर्लक्ष केले होते म्हणून तेथील कामगारांनी युनियन बदलली. संघटना बदलल्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने सुडबुद्धीने आजपर्यंत एकूण वीस कामगारांना निलंबित केले असून एकूण दहा कामगारांना हरियाणा बावळ येथे बदली आदेश दिले. कवडीमोल रक्कम देऊन स्वेच्छा निवृत्ती घेण्यास कामगारांना भाग पाडले जात आहे. कायम कामगारांना कंपनी बाहेर काढून कंत्राटी कामगारांच्याकडून उत्पादकता काढून घेतले जात आहे.

गेल्या दहा महिन्यांमध्ये कामगारांवर होणाऱ्या कारवाया थांबाव्या आणि कामगारांना दैनंदिन कामकाजात येणाऱ्या समस्या निवारण व्हावे म्हणून कंपनीकडे आम्ही समेट घडविण्यासाठी चर्चेची मागणी केली. मा. कामगार आयुक्त, पोलिस आयुक्त, मा. कारखाना निरीक्षक, यांचेकडे आमचे गाऱ्हाणे मांडले. परंतु कंपनीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. दिनांक 23/8/2022 रोजी कॅन्टीन बहिष्कार आणि काळी फीत बांधून निषेध आंदोलन चालू केले. तरीही कंपनी व्यवस्थापनावर कोणताही परिणाम झाला नाही. सुमारे 95 व्या दिवशी जेवण बंद असल्यामुळे कामगारांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्या कारणाने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार श्री. सचिनभाऊ अहिर साहेब सदर आंदोलन मागे घेण्याचे कामगारांना आवाहन करण्यासाठी दि. 25/11/2022 रोजी कंपनीच्या गेटवर आले होते. परंतु कंपनी व्यवस्थापनाने त्यांना कंपनीच्या आत प्रवेश नाकारला आणि कामगारांनी आंदोलन मागे घेऊनही एकूण 165 दिवस कंपनीने कामगारांची कॅन्टीन सुविधा बंद ठेवली. कंपनी व्यवस्थापन आतील कार्यरत असणाऱ्या कामगारांचे शोषण करीत आहे आणि अंतर्गत युनियन करण्यासाठी दबाव टाकत आहे. म्हणून निषेधार्थ कामगारांनी दिनांक 23/03/2023 रोजी एक दिवसीय ठीय्या आंदोलन करायचे ठरवले. याप्रसंगी संघटनेचे प्रदेश सचिव श्री. ईश्वरजी वाघ साहेब आणि युनियन कमिटी मेंबर श्री. दिलीप भोंडवे, श्री. सुनिल राजगुरू, श्री. आत्माराम धुमाळ, श्री. सुनिल परसे, श्री. भाऊसाहेब कदम, श्री. रवींद्र खराडे, श्री. निखिल शेटे, श्री. गोकुळ झुरूंगे, श्री. संतोष तापकीर आणि सर्व कामगार उपस्थित होते.