भोसरी गावच्या यात्रेत बैलगाडा स्पर्धा ८ एप्रिल रोजी, ग्रामस्थांच्या बैठकित निर्णय

0
400

भोसरी, दि. २३ (पीसीबी) – भोसरी गावाने आपली यात्रेची परंपरा आजही कायम राखली आहे. दरवर्षी सालाबादप्रमाणे होणाऱ्या हणुमान जयंतनिमीत्त भोसरी गावच्या भैरवनाथ महाराजांची यात्रा यावर्षी ८ आणि ९ एप्रिल तारखेला होणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर संपुर्ण भोसरी ग्रामस्थांच्या उपस्थीतीत बैठक होणाऱ्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला. बैठकितील निर्णयाची माहिती माजी नगरसेवक पंडित गवळी यांनी दिली.

अनेक वर्षांपासून चालत अलेली ही परंपरा असून या बैठकीत आगामी पिकपाण्याविषयी भाकीत वर्तवण्याची जुणी प्रथा आहे. यावेळी गावातील आबालवृधांपासुन तरूणांची उपस्थिती मोठया प्रमाणात होती. भोसरीतील भैरवनाथ महाराज मंदीरात झालेल्या या बैठकीत गावातील अनेक विषयावर चर्चा करण्यात येते. आजच्या काळात अनेक गावांचे रुपांतर शहरात झाले त्याप्रमाणे भोसरीगाव सुद्धा औैधोगीक नगरी म्हणुन नावारुपाला आले. भोसरीगाव आता मेटृो सिटीकडे वाटचाल करते आहे. अशा परिस्थितीत जुन्या प्रथापरंपरा जतन करायचे काम गावकरी करीत आहेत.

आजच्या काळात सुद्धा गावची यात्रा पारंपारीक पद्धतीनेच होणार असून यामध्ये चक्री भजण, पारंपारीक ढोलताशा मंडळांचा खेळ, पालखी प्रदक्षीणा आणि तमाम जनतेचे आकर्षण असलेली भव्य बैलगाडा शर्यत होणार आहे. बैलगाडी स्पर्धा ८ एप्रिल रोजी होणार आहे, तर लोककला तमाशाचा कार्यक्रम (लावणी) रात्री तसेच हजेरी दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता होणार आहे. गावचे वैभव असलेल्या भव्य कुस्त्यांच्या आखाडयाचे आयोजण ९ एप्रिल रोजी करण्यात आलेले आहे.