तरुणावर गोळीबार करून पळून निघालेल्या आरोपीला बेड्या

0
513

दिघी, दि. २३ (पीसीबी) – तरुणावर गोळीबार करून पळून निघालेल्या एकाला गुन्हे शाखा युनिट तीनने अटक केली. त्याच्याकडून पिस्टल, एक जिवंत काडतूस आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. गोळीबारीची घटना 18 मार्च रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता वडमुखवाडी येथे घडली.

हरिओम पांचाळ (वय 20, रा. आळंदी देवाची) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने त्याचा साथीदार मुन्ना शेख याच्यासोबत मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. सिद्धेश गोवेकर (रा. वडमुखवाडी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश गोवेकर हे 18 मार्च रोजी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून हरिओम याने त्याच्या साथीदारासोबत येऊन गोवेकर यांच्या दिशेने पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. गुन्हा केल्यानंतर हरिओम हा बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत होता. दरम्यान पोलिसांनी त्याला सापळा लाऊन अटक केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.