चाकण मधून तीन लाखांचा गुटखा जप्त

0
235

चाकण, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनने चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा लाऊन दोन लाख 94 हजार रुपये किमतीचा गुटखा व तंबाखू जप्त केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 21) आळंदी फाटा, चाकण येथे करण्यात आली.

संदीप उमा शंकर द्विवेदी (वय 27), मोहन रामनरेश गुप्ता (वय 21), लवकुश कमलेश लाक्षाकार (वय 21), सुमित विनोदकुमार इटोदिया (वय 26), संतोष उमाशंकर द्विवेदी (वय 28) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आळंदी फाटा येथे काहीजण गुटखा विक्री साठी आले असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चौघांना एक कार, एक दुचाकी, दोन लाख 94 हजार 610 रुपये किमतीच्या गुटख्यासह पकडले. कार आणि दुचाकीवरून आरोपी गुटखा विक्रीसाठी जात होते. या कारवाईमध्ये पोलिसांनी 11 लाख 54 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.