भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत..या विषयावर खुली निबंध स्पर्धा

0
466

भोसरी, दि. २२ (पीसीबी) – साई कला आविष्कार नाट्य संस्था,भोसरी,पुणे ३९ वतीने नि:शुल्क खुली राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.या निबंध स्पर्धेत शालीय विद्यार्थी वर्ग,काॅलेजयुवक वर्ग,काॅलेज प्राध्यापक व सर्व स्तरातील नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहान करण्यात आलेले आहे.

निबंधाचा विषय “भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत..!”वर* शब्दमर्यादा नसलेली हि प्रथम भव्य स्पर्धा होत आहे.प्रत्येक सहभागींना सन्मानपञ देऊन गौरविण्यात येणार आहे.विजेत्यांना समारंभपूर्वक स्मृतीचिन्ह,सन्मानपञ, देऊन गौरविण्यात येणार आहे.आपल्या विचारांना खुले व्यासपीठ मिळावे.यासाठीच या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.कोणत्या गटात ही स्पर्धा होणार नाही.प्रथम सर्व स्पर्धेकातून फक्त प्रथम तीनच क्रमांक काढण्यात येणार आहे.जाणकार परीक्षकांकडून निबंधाची निवड करण्यात येणार आहे.

तरी सर्वांनी आपला निबंध पुढील पत्त्यावर दि ५ एप्रिल पर्यंत लेखी स्वरुपात पाठवावे.
प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे.
अध्यक्ष
साई कला आविष्कार नाट्य संस्था
साई सदन,ए/३,महालक्ष्मी हाईटस,भोसरी,पुणे -४११०३९.व पोष्टाने पाठवावे.
असे आवाहान करण्यात आलेले आहे.