पंतप्रधान मोदीं यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्टर, 6 जणांना अटक, 100 हून अधिक FIR दाखल

0
253

दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील आक्षेपार्ह पोस्टर्सप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे . याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना अटक केली आहे. तर 100 हून अधिक एफआयआरही नोंदवण्यात आले आहेत.

प्रिंटिंग प्रेस अॅक्ट आणि प्रॉपर्टी अॅक्टच्या कलमांखाली एफआयआर नोंदवला गेला

विशेष सीपी दीपेंद्र पाठक म्हणाले, दिल्ली पोलिसांनी संपूर्ण शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्टर लावल्याबद्दल 100 एफआयआर नोंदवले , तर 6 जणांना अटक करण्यात आली. पोस्टर्समध्ये छापखान्याचा तपशील नव्हता. प्रिंटिंग प्रेस अॅक्ट आणि प्रॉपर्टी अॅक्टच्या कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पीएम मोदींविरोधातील वादग्रस्त पोस्टर प्रकरणात आम आदमी पार्टीचेही नाव समोर येत आहे . विशेष सीपी दीपेंद्र पाठक म्हणाले, कार्यालयातून बाहेर पडताच एक व्हॅनही थांबवण्यात आली. काही पोस्टर्स जप्त करून अटक करण्यात आली.

पोस्टर लावताना पोलिसांनी तरुणाला अटक केली होती

काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल अमिताभ मीणा यांनी एका व्यक्तीला पोस्टर लावताना पकडले. मात्र, चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले.

10,000 हून अधिक मोदीविरोधी पोस्टर्स छापण्यात आले

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सुमारे 10,000 आक्षेपार्ह पोस्टर्स छापण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जे संपूर्ण दिल्लीत बसवण्याची योजना होती. याप्रकरणी पोलीस सातत्याने कारवाई करत आहेत. या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता आहे.