पिस्तूल आणि गांजा बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

0
192

शिरगाव, दि. २० (पीसीबी) – पिस्टल आणि गांजा बाळगल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मावळ तालुक्यातील पुसाणे येथून दोघांना अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. १८) दुपारी चार वाजताच्या सुमारास करण्यात आली.

मयूर अनिल घोलप (वय २९, रा. पुसाणे, ता. मावळ. मूळ रा. चिंचवडगाव), शंभू संजय गंगावणे (वय २१, रा. सातारा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील पुसाणे गावात दोघेजण संशयितरित्या आले असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दुचाकी, एक पिस्टल आणि गांजा असा एकूण एक लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.