पीएमपी बसची तोडफोड, प्रवाशांना धमकावले, तिघांना अटक

0
322

बावधन, दि. २० (पीसीबी) – तिघांनी रविवारी (दि. १९) दुपारी चार वाजताच्या सुमारास बावधन येथे पीएमपी बस अडवली. बसची आणि बसच्या पुढे असलेल्या एका कारची तोडफोड करून बसमधील प्रवाशांना धमकावले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

रामा रेड्डी मेघावत (वय २४, रा. पाषाण, पुणे), अजय नेहरू राठोड (वय २२, रा. कुलाबा मुंबई), पवन अंबादास मगर (वय २२, रा. पाषाण, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बस चालक योगेश बोरसे (वय ३१) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पीएमपी बस घेऊन बावधन येथून जात असताना तिघांनी त्यांची बस अडवली. त्यानंतर बस आणि बससमोर असलेल्या एका कारची तोडफोड करून नुकसान केले. तिघांनी बसमधील प्रवाशांना धमकावून फिर्यादी आणि बस वाहक यांना मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत