अदानी कंपनीचा वीज निर्मिती आणि वितरणात तब्बल 10,000 कोटी रुपयांचा घोटाळा

0
255

– वीज महाग होण्याचे कारण साधनांची कमतरता नाही, तर अदानींचा भ्रष्टाचार

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – अदानी एंटरप्राइझ लिमिटेड कंपनीने राजस्थान आणि महाराष्ट्रात वीज निर्मिती आणि वितरणात तब्बल 10,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आप ने केला आहे. या प्रकरणाची केंद्रीय एजन्सीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना, आम आदमी पार्टी (आप) चे प्रवक्ते संजय सिंह यांनी दावा केला की अदानी एंटरप्राइझ लिमिटेड ने महाराष्ट्र सरकारकडून वीज निर्मिती आणि ऑपरेशनसाठी पैसे घेतले आणि नफाही खिशात टाकला.

“आज मी आणखी एक घोटाळा उघड करत आहे. या घोटाळ्यात लुटलेल्या पैशातून दिल्लीला तीन वर्षे मोफत वीज देता येईल. राजस्थान आणि महाराष्ट्रात वीज महाग होण्याचे कारण साधनांची कमतरता नाही. याचे कारण अदानींचा उघड भ्रष्टाचार आहे,” असा दावा त्यांनी केला. सिंग म्हणाले की, 2014 पूर्वी अदानीच्या सहा कंपन्यांनी राजस्थान आणि महाराष्ट्रातील वीज क्षेत्रात प्रवेश केला आणि त्यांनी सरकारकडून वीजनिर्मितीसह कामकाज चालवण्याचा खर्च तर घेतलाच, पण खिशातही टाकले आणि नफासुध्दा लाटला, असे संजय सिंह यांनी निदर्शनास आणून दिले.

“ अदानी यांनी त्याचा भाऊ विनोद अदानी यांच्या बनावट कंपनीचा वापर करून चीनमधून स्वस्त मशिन्स चढ्या किमतीत आणल्या,” असे नेते म्हणाले, मशिन्सचे पैसे महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात आले होते. हा मुद्दा महसूल संचालनालयाने उघड केला होता. मोदी सरकार सत्तेवर आल्याने गुप्तचर माहिती मात्र कारवाई झाली नाही, असे सिंग म्हणाले.
” हा तब्बल १०,००० कोटींचा घोटाळा आहे. अदानीने मॉरिशस आणि दुबईतील आपल्या भावाच्या बनावट कंपन्यांकडून वीज निर्मितीसाठी मशिन महागड्या किंमतीत विकत घेतल्या आणि महाराष्ट्र सरकारकडून त्या विकत घेण्यासाठी पैसे घेतले,” सिंह म्हणाले. “DRI ने सहा जणांना नोटिसा बजावल्या. तपासासाठी अदानींच्या कंपन्यांवर कारवाई सुरू झाली होती, पण मोदी सरकारने तपास थांबला. सीबीआय देखील एफआयआर नोंदवत नाही किंवा कारवाईही करत नाही,” ते पुढे म्हणाले.