शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

0
301

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – शस्त्र बाळगल्या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई शुक्रवारी दुपारी पावणे दोन वाजता पिंपळे सौदागर येथील स्वराज चौकात करण्यात आली.

अभिषेक भगवान मोहिते (वय २१, रा. पिंपळे सौदागर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार सुनील शिरसाट यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील स्वराज चौकात एकजण शस्त्र घेऊन आला असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अभिषेक याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २५० रुपये किमतीचा एक कोयता आढळून आला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.