पार्किंग मधून भर दिवसा दुचाकी चोरीला

0
202

भोसरी, दि. १८ (पीसीबी) – पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथील उड्डाणपुलाखाली असलेल्या पार्किंग मध्ये पार्क केलेली दुचाकी दिवसभराच्या कालावधीत चोरीला गेली. ही घटना बुधवारी (दि. १५) घडली.

सुनील बब्रुवान वाघचौरे (वय ३०, रा. शांतीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी भोसरी येथील उड्डाणपुलाखाली असलेल्या पार्किंग मध्ये बुधवारी सकाळी सात वाजता पार्क केली. दिवसभराच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. रात्री साडेआठ वाजता हा प्रकार उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.