मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या नायजेरियन व्यक्तीस अटक अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

bpcauthor bpcauthor
2 Min Read

सांगवी, दि. १४ (पीसीबी) – अंमली पदार्थ विरोधी पथकाने सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेफेड्रोन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका नायजेरियन व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून मेफेड्रोनसह सव्वा लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. १३) करण्यात आली.

बनकोले युसुफ ओओलाबी (वय २४, रा. मोरया पार्क, सांगवी. मूळ रा. ए नंबर २ ओशीडी, लोगोस, नायजेरिया) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना सांगवी परिसरात राहणारा नायजेरियन व्यक्ती मेफेड्रोन विक्रीसाठी येणार आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन टीम बनवून सापळा लावला. एक संशयित व्यक्ती दुचाकीवरून आला. त्याला पोलिसांचा सुगावा लागताच तो पळून जाऊ लागला. त्यावेळी पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ६८ हजारांचा १७ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ आढळला. पोलिसांनी अंमली पदार्थ आणि दुचाकी असा एकूण एक लाख २८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करत त्याला अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त मनोज लोहिया,अपर आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार, उपनिरीक्षक राजन महाडीक, अंमलदार प्रदीप शेलार, संदीप पाटील, मितेश यादव, अशोक गारगोटे, सदानंद रुद्राक्ष, संतोष भालेराव, बाळासाहेब सूर्यवंशी, पांडुरंग फुंदे यांनी केली.

Share This Article