पोलिसांच्या चौकशीदरम्यान एकाचा मृत्यू

0
298

-नातेवाईकांच्या आरोपाने शहरात खळबळ

पिंपरी, दि.: १२(पीसीबी )- अंमली पदार्थ असल्याच्या संशयावरून पोलीस चौकशी करत असताना एकाचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी मारहाण केल्याने मृत्यू झाला असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही घटना शनिवारी (दि. ११) सकाळी शास्त्री चौक, भोसरी येथे घडली

लक्ष्मण पवार (वय ४५, रा. शास्त्री चौक, भोसरी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मण पवार यांच्याकडे अंमली पदार्थ असल्याची माहिती भोसरी पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली. त्यानुसार, तपास पथक शनिवारी सकाळी लक्ष्मण पवार यांच्या घरी जाऊन चौकशी करीत होते. पोलिसांची चौकशी सुरु असताना लक्ष्मण पवार यांना अचानक भोवळ आली. नातेवाईकांनी त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच लक्ष्मण पवार यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

पोलिसांनी मारहाण केल्याने लक्ष्मण पवार यांचा मृत्यू झाला, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले. मात्र, असा कोणताही प्रकार नसल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांनी सांगितले. या प्रकरणात आकस्मित मृत्यू अशी नोंद घेण्यात आली आहे. घटनेचे गंभीर्य लक्षात घेत या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा युनिट एककडे सोपविण्यात आला आहे.

पोलिसांनी मारहाण केल्याने मृत्यू झाल्याचा आरोपी केल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या आरोपानुसार मयताच्या अंगावर मारहाणीचे व्रण नाहीत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.
ज्ञानेश्वर काटकर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट एक