२०२४ ला चिंचवडचा आमदार राष्ट्रवादीच असणार कार्यकर्त्यांचा निर्धार
चिंचवड, दि.१०(पीसीबी)- नुकत्याच झालेल्या चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकीनंतर काल महाविकास आघाडीच्या वतीने आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड विधानसभेचा आमदार हा राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचाच होईल असा निर्धार महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेल्या जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने थेरगाव येथे गुरुवारी (दि. ९) आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या पाठीशी मतदारसंघातील नागरिकांनी, मतदारांनी मोठी ताकद उभी केली होती.
जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवाराप्रती दाखविलेल्या विश्वासास आम्ही कधीही तडा जावू देणार नाही, जनतेने दाखविलेला विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे नक्कीच ऋणी राहू, मात्र जनतेचे आभार मानणे हे देखील महाविकास आघाडीचे कर्तव्य आहे.असे मत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व उमेदवाराने व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.नगरसेवक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते विनायक रणसुभे यांनी केले. यावेळी नरेंद्र बनसोडे, प्रवीण कदम ,अजितभाऊ गव्हाणे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. चिंचवड विधानसभेचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी सर्व उपस्थितांचे व मतदारांचे आभार मानले.
प्रविण कदम (संभाजी ब्रिगेड अध्यक्ष ),कविताताई आल्हाट (महिला शहराध्यक्षा), विजय ओव्हाळ (काँग्रेस आय अध्यक्ष चिंचवड विधानसभा), मा. नगरसेवक राजेंद्र जगताप, मोरेश्वर भोंडवे, विनोद नढे, संतोष कोकणे, माई काटे , माया बारणे (नगरसेविका), शितलताई काटे (नगरसेविका), उषाताई वाघेरे (नगरसेविका ), उषाताई काळे, निकिता कदम , संगिताताई ताम्हाणे नगरसेविका, राजेद्र साळुंखे (मा. नगरसेवक), हरीभाऊ तिकोणे (मा नगरसेवक), ईम्रान शेख, फजल शेख, युनुस कुरेशी, प्रकाश जाधव, काशिनाथ नखाते (कष्टकरी कामगार संघटना), हरेश नखाते, माऊली सुर्यवंशी, विजय दर्शिले , संदीप पवार, रोमी संधू (शिवसेना नेते) ,सागर कोकणे, शाम जगताप,तानाजी जवळकर, सचिन काळे ,देवा नखाते सर्व आजी माजी पदाधिकारी, निरिक्षक, महिला पदाधिकारी, बूथ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.