मुंबई, दि.९ (पीसीबी)- राज्याच्या अर्थसंकल्पात सर्व घटकांना खूश ठेवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शेतकरी, कामगार, कारखानदार, महिला, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, बेरोजगारांसह जाती धर्माचा आणि संत महात्मायंच्या स्मारकांसाठी घोषणांची खैरात आहे. सर्व महत्वाच्या घोषणांची गोषवारा मुद्दे पुढीलप्रमाणे आहे.
– प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6000 वरुन 16,000 रुपये
– माध्यमिक शिक्षण सेवक : 8000 वरुन 18,000 रुपये
– उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9000 वरुन 20,000 रुपये
– पीएमश्री शाळा : 816 शाळा/ 5 वर्षांत 1534 कोटी रुपये










































