मुंबई, दि. ९ (पीसीबी) : आज विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विधानसभेच्या सभागृहात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करतील. तर विधान परिषदेत शिवसेना नेते (शिंदे गट) व मंत्री दीपक केसरकर यांच्यावर अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. मंत्रीमंडळाचा अजूनही विस्तारच झालेला नाही, त्यामुळे सरकारमध्ये कोणीच अर्थराज्यमंत्री नसल्याने, विधान परिषेदेत केसरकर हे अर्थसंकल्प मांडणार आहेत. आगामी महापालिका व लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेता, काही लोकप्रिय घोषणा होऊ शकतात, असे सांगण्या आले.
शिंदे फडणवीस सरकारचं हे पहिलंच अर्थसंकल्प आहे. यामुळे अर्थसंकल्प कसा असावा? यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश व्हावा, कोणत्या तरतुदींची अपेक्षा आहे. यासाठी सरकारच्या वतीने जनतेच्या सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. सर्वसामान्य जनतेच्या सूचानांचा विचार करून, हा अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या अर्थसंकल्पातून कोणत्या क्षेत्राला किती निधी देण्यात येणार हे पाहणं महत्त्वपूर्ण असणार आहे.
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पीकाचं प्रचंड हानी झाली. ऐन हातातोंडाशी आलेले पीक निसटून गेल्यानं शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे शेतीसाठी भरील तरतूद होण्याची जास्त शक्यता आहे.