आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा

0
598

नाशिक, दि. ८ (पीसीबी) : अपक्ष आमदार बच्चू कडू यांना सरकारी अधिकाऱ्याला मारहाण करणे चांगलेच भोवले आहे. नाशिक महापालिका आयुक्तांवर आमदार बच्चू कडू यांनी हात उगारला होता. हे प्रकरण कोर्टात पोहोचले होते. या प्रकरणात बच्चू कडू यांना कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

नाशिक आयुक्तांवर हात उगारल्या प्रकरणी बच्चू कडू यांना दोन वेगवेगळ्या प्रकारणात ही दोन वर्षाची शिक्षा झाली आहे. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालायात सुनावणी सुरु होती. 2017 साली नाशिक महापालिकेत अपंगांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरु होते. महापालिका आयुक्त यांना धमाकवने आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदर बच्चू कडू यांच्यावर होता. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार न्यायालयाने तत्कालीन जलसंपदा आणि शिक्षण राज्यमंत्री ​​बच्चू कडू यांना 2014 मध्ये अचलपूरचे आमदार म्हणून निवडून आल्याच्या तक्रारीत दोषी ठरवले होते. त्यांना न्यायालयाने दोन महिन्यांचा साधा कारावास आणि 25,000 रुपये दंड ठोठावला आहे.

बच्चू कडू हे तीन वेळा आमदार अचलपूर मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून पुन्हा निवडून आले आणि नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री म्हणून नियुक्त झाले होते. ठाकरे गटाची साथ सोडत ते आता शिंदे गटासोबत ते गेले आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या एका स्थानिक नेत्याने 2017 मध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, कडू यांनी 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुंबईत किमान एक सदनिका असल्याची माहिती लपवली होती आणि त्यामुळे लोकप्रतिनिधी कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन केले होते. सुमारे पाच वर्षे चाललेल्या खटल्यानंतर न्यायालयाने कडू यांना दोषी ठरवले.

दरम्यान, मुंबईत त्यांनी आमदारांसाठी एका सोसायटीत घेतलेला फ्लॅट कर्जापोटी होता, त्यांनी निवडणूक शपथपत्रात कर्जाची रक्कम दाखवली होती, त्यामुळे त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही, असा दावा बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आला होता.