गोविंद वाकडे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र निमंत्रक

0
555

मुंबई, दि. ०५ (पीसीबी) : न्यूज 18 – लोकमतचे पिंपरी – चिंचवड चे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांची पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र निमंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे..राज्य निमंत्रक एस.एम देशमुख यांनी आज येथे घोषणा केली.. पुढील दोन वर्षांसाठी ही नियुक्ती असेल..

गोविंद वाकडे गेली पंधरा वर्षे पत्रकारितेत आहेत.. मुळचे यवतमाळ जिल्ह्य़ातील उमरखेडचे रहिवासी असलेले वाकडे अगोदर न्यूज 18 लोकमतचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी होते .. नंतर पुणे प्रतिनिधी म्हणून आणि गेली दहा वर्षे पिंपरी चिंचवडचे प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत आहेत..

गोविंद वाकडे याच्या नियुक्तीबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे आणि विभागीय सचिव अरूण तथा नाना कांबळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे…