वेश्या व्यवसाय प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

0
416

चऱ्होली, दि. ४ (पीसीबी) – वडमुखवाडी येथे रस्त्यावर थांबून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना वेश्या व्यवसायासाठी आकर्षिक करणाऱ्या एका महिलेवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण सहायक आयुक्तांच्या पथकाने शुक्रवारी (दि. ३) दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही कारवाई केली आहे.

वडमुखवाडी येथे एका शाळेजवळ रस्त्याच्या बाजूला थांबून एक महिला वेश्या व्यवसायासाठी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अश्लील हावभाव करून आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत होती. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर चाकण सहायक आयुक्तांच्या पथकाने याप्रकरणी कारवाई करत महिलेविरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.