हिंजवडी, दि. ३ (पीसीबी) – शादी डॉट कॉम वरून महिलेशी ओळख करत तिला लग्नाचे आमिष दाखवले अन पुढे हळूहळू करत तिची बचत तसेच काही खासगी अपद्वारे लोन घेण्यास सांगून 19 लाख रुपयांची फसणूक केली आहे. हा प्रकार सप्टेंबर 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत हिंजवडी फेज वन, विशालनगरी परिसरात घडला आहे.
याप्रकरणी महिलेने बुधवारी (दि. 1) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अमोल अशोकराव पिंपळे (देशमुख) (वय 33 रा. पळसखेडा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आरोपीशी शादी डॉटकॉमवरून ओळख झाली,लग्नासाठी संपर्क झाला. विश्वास संपादन करत आरोपीने तो व्यावसायीक असून त्याच्या व्यवसायात अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांना बचत केलेले पैसे कसे काढायचे, त्यावर वेगवेगळ्या अप द्वारे लोन कसे घ्यायचे हे आरोपीने सांगितले. फिर्यादीला लोन घेण्यास सांगून पैसे त्याने स्वतःच्या मित्राच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. तर काही स्वतः भेटून रोख स्वरूपात घेतले. तसेच फिर्यादी यांच्याशी शारिरीक संबंध ठेवत आज अखेर घेतलेले 19 लाख रुपये परत केले नाही फिर्यादी यांच्यासी विवाह न करता त्यांची फसवणूक केली. सांगवी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तरी नागरिकांनी खात्री पटल्या शिवाय मॅट्रीमोनियल साईटवरील व्यक्तीशी जवळीक वाढवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.












































