इन्फ्राटेक वेंचर इंडिया बांधकाम कंपनी कडून ग्राहकाची 64 लाख रुपयांची फसवणूक

0
232

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – एका प्री लॉन्च प्रोजक्ट मध्ये दोन फ्लॅट देतो असे सांगत तेलंगणामधील एका बंधाकाम कंपनीने चिंचवड येथील नागरिकाची 64 लाख रुपयांची फसणूक केली आहे. हा प्रकार डिसेंबर 2020 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत चिंचवड येथील थरमॅक्स चौक येथे घडला आहे.

याप्रकरणी महिलेने बुधवारी (दि.1) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून इन्फ्राटेक वेंचर इंडिया हैद्राबाद यांचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण बुडाती (वय 44), पार्वती बुडाती (वय 40), पुर्णचंदर राव व भास्कर नायडू (सर्व रा. हैद्राबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एकूण 10 टॉवरचा इलाईट प्रोजेक्ट प्री लॉन्च करत असून त्यामध्ये फिर्यादीचे पती व मुलगी यांना फ्लॅट विक्रीचे आमिष दाखवून 64 लाख रुपये घेतले. मात्र अद्यापही कोणताच फ्लॅट किंवा गुंतवलेले पैसे न देता फिर्यादीची व त्यांच्या मुलीची फसवणूक केली आहे. यावरून आरोपींवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.