काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती खालवली

0
244

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती खालवल्याने त्यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. रायपूर येथे नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या ८५व्या अधिवेशनात सोनिया गांधी यांची प्रकृती बरी नव्हती अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.

सोनिया गांधी यांच्यावर डॉ. अरूप बासू यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्यांना २ मार्चला म्हणजेच गुरुवारी ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.