धक्कादायक ! सुप्रसिद्ध मॉडेलची हत्या; फ्रीजमध्ये सापडले मृतदेहाचे तुकडे

0
253

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी)- नुकतेच श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता, अशा परिस्थितीत आता चीनमधून अशा निर्घृण हत्येचे प्रकरण समोर आले आहे. इथे एका प्रसिद्ध मॉडेलची हत्या करण्यात आली आहे. ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या चायनीज मॉडेलचे नाव एबी चोई होते. तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. 

या मॉडेलची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते. होय, फ्रीजमध्ये पाय सापडले, तर शरीराचे उर्वरित अवयव पोलिसांना सापडलेले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण चीनच्या हाँगकाँगशी संबंधित आहे. या प्रकरणी पोलिसांनी मॉडेल चोईचा माजी पती आणि त्याच्या नातेवाईकांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आता पर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

या घटनेचा तपास करताना पोलिसांना त्यांना तेथे ठेवलेल्या सूप पॉटमध्ये मृतदेहाचे अवशेष सापडले. पोलिसांनी सांगितले की, हाँगकाँगची मॉडेल अॅबी चोईच्या हत्येप्रकरणी तिचे माजी सासरे आणि सासरच्या मोठ्या भावावर खुनाचा आरोप आहे. तसेच, तिच्या माजी सासूवर न्यायात अडथळा आणल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी मॉडेलच्या 28 वर्षांच्या माजी पतीला अटक केली. मॉडेल अनेक दिवसांपासून बेपत्ता होती. ती कुठे गेली हे कोणालाच कळले नाही. अशा परिस्थितीत आता तिच्या मृतदेहाचे तुकडे पोलिसांनी जप्त केले आहेत.

शुक्रवारी हाँगकाँगमधील ताई पो गावात पोलीस अधिकाऱ्यांना तिच्या मृतदेहाचे तुकडे सापडले तेव्हा ही बाब उघडकीस आली. हा फ्रीज गावातच एका घरात ठेवला होता. या घरातून इतर वस्तूही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अॅलन चुंग यांनी शनिवारी दिली. त्यात मीट ग्राइंडर, सॉ, रेनकोट, हातमोजे आणि मास्क यांचा समावेश आहे. तपासाअंती असे समोर आले की अॅबी चोईचा तिचा माजी पती आणि त्याच्या कुटुंबाशी आर्थिक वाद सुरू होता.

पोलिसांना फ्रीजमध्ये महिलेचे कापलेले पाय सापडले. हा पाय चोईचा आहे की अन्य महिलेचा आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही, परंतु घराची झडती घेतली असता चोईचे ओळखपत्र, क्रेडिट कार्ड आणि इतर वस्तू सापडल्या. त्यामुळे कापलेला पाय त्याचाच असल्याची पुष्टी झाली. घटनास्थळी चोईचे डोके, धड आणि हात आढळून आले नाहीत. पोलीस अजूनही या अवयवांचा शोध घेत आहेत.