दुचाकीस्वाराला दगडाने मारून लुटले

0
180

हिंजवडी, दि. २८ (पीसीबी) – दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला दगडाने मारून खाली पाडले. त्यानंतर दुचहकी आणि मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. २५) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास हिंजवडी फेज तीन येथे घडली.

वैभव वाघजी बेले (वय १८, रा. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव त्यांच्या दुचाकीवरून मित्राच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यासाठी हिंजवडी फेज तीन येथील फाउंटन मार्केट येथे जात होते. रस्त्याने जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी वैभव यांच्या दुचाकीला दगड मारला. त्यामुळे वैभव रस्त्यावर पडले. वैभव खाली पडताच दोन्ही चोरट्यांनी वैभव यांचा मोबाईल फोन आणि दुचाकी असा दहा हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला.