लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार

0
197

हिंजवडी, दि. २८ (पीसीबी) – लग्नाच्या आमिषाने महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. तिचा गर्भपात करून तिच्याकडून सहा लाख रुपये घेत ते परत न करता विश्वासघात केला. हा प्रकार ९ सप्टेंबर २०१९ ते २८ डिसेंबर २०२२ या कालावधीत हिंजवडी, मारुंजी, काळेवाडी परिसरात घडला.

सिद्धार्थ त्रिपाठी (वय ३८, रा. मध्य प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने रविवारी (दि. २६) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ याने फिर्यादी महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर कुणाला काहीही सांगू नको, मी तुझ्याशी लग्न करतो म्हणत त्याने महिलेस जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने महिलेला वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. महिला गरोदर राहिली असता तिला गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला. सन २०१६ ते २८ डिसेंबर २०२२ या कालावधीत त्याने फिर्यादीकडून सहा लाख रुपये घेतले. ते पैसे परत न करता तिचा विश्वासघात केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.