वाईन शॉप समोरून दुचाकी चोरीला

0
202

हिंजवडी, दि. २८ (पीसीबी) – वाईन शॉप समोर पार्क केलेली दुचाकी अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. २३) रात्री भूगाव येथे घडली.

प्रशांत अवधूत कान्हेकर (वय ३४, रा. न्यू अहिरे गाव, पुणे) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. २६) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कान्हेकर यांचा मेहुणा अमोल म्हैसेकर यांनी त्यांची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १२/आरएल २०३४) भूगाव येथील एका वाईन शॉप समोर पार्क केली. वाईन शॉप समोरून अज्ञाताने त्यांची दुचाकी चोरून नेली. ही घटना गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.