रस्ता ओलांडणाऱ्या महिलेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

0
257

निगडी, दि. २४ (पीसीबी) – रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी महिलेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. २३) पहाटे सव्वापाच वाजता खंडोबामाळ चौक, निगडी येथे घडला.

शांता हनुमंत जाधव (वय ६०, रा. चिंचवड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शांता यांचा मुलगा सचिन हनुमंत जाधव (वय ३५) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आई शांता जाधव या गुरुवारी पहाटे सव्वापाच वाजताच्या सुमारास खंडोबा माळ चौक येथे पायी रस्ता ओलांडत होत्या. रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या वाहनाने दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने शांता यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.