धक्का लागल्याने दोघांना बेदम मारहाण

0
273

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – हॉटेलमध्ये पार्सल जेवण आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दोघांना धक्का लागला. त्यावरून चौघांनी तरुणाला आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. २०) रात्री काळेवाडी येथे घडली.

ओमकार संभाजी खेडकर (वय २२, रा. तानाजीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रणव उर्फ पिल्या कांबळे, शुभम चंद्रकांत कळमकर, पार्थ मांडवकर, आदित्य उर्फ भद्ऱ्या चव्हाण (सर्व रा. चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खेडकर आणि त्यांचा मित्र सोमवारी रात्री साडेअकरा वाजता काळेवाडी पुलाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये जेवण पार्सल आणण्यासाठी गेले. त्यावेळी खेडकर यांचा शुभम आणि पार्थ या दोघांना धक्का लागला. त्यावरून शुभम आणि पार्थने प्रणव आणि आदित्य यांना बोलावून चौघांनी खेडकर व त्यांच्या मित्राला दगडाने, हाताने, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.