मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य रोड शो…!

0
205

पिंपरी, दि.२२ (पीसीबी) : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक महायुतीच्या अधिकृत उमेदवार अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे.

आज बुधवार दि. २२ फेब्रुवारी २०२३ या रोड शो चे आयोजन करण्यात आले आहेत. तरी संध्याकाळी ४.३० वा. हा रोड शो पार पडणार आहे.

सायंकाळी साडेचार वसंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोड शो ला सुरुवात होईल. या रॉड शो चा मार्ग उत्कर्ष चौक दत्तमंदिर जवळ वाकड – वाकड रोड – डांगे चौक – दत्तनगर जुना जकात नाका -चापेकर चौक – गांधीपेठ – पॉवर हाउस चौक – केशवनगर – एम एम हायस्कूल काळेवाडी – कुणाल हॉटेल – खुळे ऑफिस – विमल गार्डन समोरून – शिवेंद्र लॉंन्स येथे जाहीर सभा. अशा प्रकारे या रॉड शो चे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या रोड शो च्या कार्यक्रमाला सर्व कार्यकर्त्यांनी तसेच भाजप व मित्र पक्षाने मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन देखील खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. दरम्यान आज ठिकठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे स्वागत केले जाणार आहे. तसेच रहाटणी मावळ येथील शिवेंद्र लॉन्स येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाहीर सभा देखील घेणार आहेत.