वृद्धास तलवारीने मारण्याचा प्रयत्न

0
276

शिरगाव, दि. २१ (पीसीबी) – रस्त्यावर खडी टाकल्याच्या कारणावरून एकाने वृद्ध व्यक्तीला शिवीगाळ केली. तसेच तलवारीने मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि. २०) सायंकाळी मावळ तालुक्यातील बेबडओव्हळ येथे घडली.

भालचंद्र हरिभाऊ भालेराव (वय ७०, रा. बेबडओव्हळ, ता. मावळ) यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनोद रमेश गायकवाड (वय ४५, रा. बेबडओव्हळ, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भालेराव त्यांच्या घरासमोर दुचाकी धुवत होते. त्यावेळी त्यांच्या गावातील विनोद गायकवाड तिथे आला. रस्त्यावर खडी टाकण्याच्या कारणावरून विनोद याने भालेराव यांना शिवीगाळ केली. भालेराव यांनी विनोदला घरी जाण्यास सांगितले असता त्याने घरी जाऊन तलवार घेऊन येत भालेराव यांना मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.