अमेरिकेतही शिवजयंतीचा जल्लोष

0
388

पिट्सबर्ग (अमेरिका) , दि. २१ (पीसीबी) – अमेरिकेतील पेनसिल्वानिया राज्यातील पिट्सबर्ग – मोनरोविले येथील हिंदू मंदिराने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सुमारे 150 भारतीयांनी एकत्र येऊन शिवाजी महाराजांना वंदन केले. लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवरायांवर प्रेम व्यक्त केले.

भारताच्या वेशभूषा स्पर्धेत तीस मुलांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कृष्णा, जिजाऊ, झाशीची राणी, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अत्यंत सुसंस्कृत वेशभूषा करून सर्वांची मने जिंकली. ज्युरी म्हणून सौ.भाग्यश्री भाग्यश्री चिप्पलकट्टी पटवारी व सौ.लक्ष्मी महाजन यांनी काम पाहिले.यावेळी मंदिराचे सदस्य श्री. राहुल देशमुख यांनी स्लाइड शो आणि छत्रपती शिवरायांच्या कथा तयार केल्या ज्यामुळे सर्वांच्या मनात शिवाजीबद्दल कुतूहल आणि आदर निर्माण झाला.

सौ. श्वेता चक्रदेव-डोंगरे श्वेता चक्रदेव यांनी रामदास स्वामी व शिवाजी महाराज गीत गाऊन कार्यक्रमात रंगत आणली.
मंदिराचे निवडणूक आयोग सदस्य श्री. सुशील शिंदे शिंदे, श्री. लक्ष्मण प्रजापत , श्री. राकेश ढाका यांनी मुलांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे ध्वनिसंयोजन श्री. सौरभ मोहरील यांनी पहिले. दुपारच्या जेवणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.