शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

0
367

दापोडी, दि. १९ (पीसीबी) – शस्त्र बाळगल्या प्रकरणी भोसरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १७) रात्री दापोडी येथे करण्यात आली.

ओमकार उर्फ दाद्या सोमनाथ गायकवाड (वय २१, रा. नेहरूनगर चौक, दापोडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक रवींद्र जाधव यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथे एक तरुण शस्त्र घेऊन थांबला असल्याची माहिती शुक्रवारी भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रात्री पावणे अकरा वाजता सापळा लावून ओमकार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.