इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ ९०.४ मध्ये जागतिक रेडिओ दिन उत्साहात साजरा

0
187

पिंपरी, दि १९ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) च्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ ९०.४ मध्ये जागतिक रेडिओ दिन उत्साहात साजरा करण्यात आला. रेडिओ सिटी ९१.१ एफएमचे आरजे केदार जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ ९०.४ एफएम ऑगस्ट मध्ये सुरू झाले. अल्पावधीतच ८० पेक्षा जास्त कार्यक्रमांची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थी, प्रोफेसर, प्रिन्सिपल, डीन, पीसीटीसीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञ, अनुभवी आणि नवोदित कलाकार, समाजसेवक, डॉक्टर, गृहिणी ,आजीआजोबा, बालगोपाळ अशा सर्वांनी या रेडिओच्या कार्यक्रम निर्मितीमध्ये सहभाग घेतलेला आहे.

करियर मित्र, अर्थात – मनी मॅटर्स, शिवरंजनी, सगळ्यांसाठी विज्ञान, आनंदाचे विज्ञान, डॉटर्स ऑफ पीसिइटी, आधी केलेची पाहिजे, तेथे कर माझे जुळती, मन तळ्यात मळ्यात, मन वढाय वढाय, स्वास्थ्य मंत्र, रंग कथा, स्वाद इन्फिनिटीचा, ग्रामगीता आणि गोंदवलेकर महाराजांच्या नाम महात्म्याचं क्रमशः वाचन, कविता समजून घेताना, खुलके मुस्कुराले तू, बिकमिंग दीड आयकॉन, कहानी बाय धवनी, मदतीचा हात, रेसिपीज बाय अंजली या सर्व मालिकांची निर्मिती रेडिओने केलेली आहे. याशिवाय संविधान दिन, बालदिन, सृजनोत्सव, किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ग्रीन बजार चा सविस्तर वृत्तांत असे अनेक नैमित्तिक कार्यक्रम सुद्धा प्रसारित झाले आहेत.

इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओच्या वतीने या सर्व सहभागींचे कौतुक करण्यात आल. रेडिओचा इतिहास, इन्फिनिटीचा अहवाल ऑडिओ व्हिज्युअल क्लिप्सच्या माध्यमातून सादर केला गेला. डिफेन्स फोर्स लेग्यू या स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगाने भविष्यात सादर होणाऱ्या ‘क्नो युवर आर्मी’ या उपक्रमाची घोषणा यानिमित्ताने करण्यात आली.

रेडिओ गीत, ध्वनी रमावतने सादर केलेली कथा, आरजे केदार जोशी यांच्याशी मुकुल मोरे आणि इतर विद्यार्थ्यांनी साधलेला संवाद यामुळे कार्यक्रम अतिशय रंगला. ‘रेडिओ – डे’च्या कार्यक्रमासाठी पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष शांताराम गराडे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे आणी धनंजय काळभोर यांचे मार्गदर्शन लाभले.

इन्फिनिटीवर कायम समाजासाठी उपयुक्त ठरतील असेच मनोरंजनाचे कार्यक्रम यापुढेही सादर होतील अशी ग्वाही रेडिओच्या निर्मिती प्रमुख माधुरी ढमाले – कुलकर्णी यांनी दिली.