कावेरीनगर पोलीस वसाहतीत घरफोडी, सव्वा सहा लाखांचा ऐवज लंपास

0
568

वाकड, दि. १८ (पीसीबी) – वाकड येथील कावेरीनगर पोलीस वसाहतीत चोरट्यांनी घरफोडी करून सव्वासहा लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. १७) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडली.

याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे घर गुरुवारी (दि. १६) दुपारी अडीच ते शुक्रवारी (दि. १७) सकाळी सव्वाअकरा वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास दोन चोरट्यांनी दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला. पाच लाख ६८ हजारांचे १५२ ग्रॅम सोन्याचे आणि २० हजारांचे चांदीचे असे एकूण सहा लाख २८ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.