शिंदेना पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठं गिफ्ट देण्याची शक्यता, श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव मंत्री होणार

0
198

नवी दिल्ली, दि.१८ (पीसीबी) : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने बहाल केल्यानंतर शिंदेना पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठं गिफ्ट देणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे गटातील काही खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळाची ऑफर मिळणार असल्याची जोरदार चर्चा रंगल्या आहेत. श्रारंग बारणे, राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव यांची नावे भावी मंत्री म्हणून चर्चेत आहेत. पुणे जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका पुन्हा राष्ट्रवादीकडे जाऊ नयेत तसेच आगामी लोकसभा निवढणुकित बारामतीसह पुणे, मावळ, शिरुर हे चार मतदारसंघाची जबाबदारी म्हणून बारणे यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

मोदी सरकारने मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवत केंद्रीय मंत्रिमंडळाळचा विस्तार करत असल्याचं बोललं जात आहे. तर उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राज्यातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा होणार असल्याचे समजते.

शिंदे गटाला शिवसेना नावासह आता धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याने आता मुंबई महापालिका निवडणुकीकडे शिंदेंचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत शिंदे गटाची भाजपला मदत व्हावी, यासाठी मोदी सरकारकडून शिंदेंना मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील कुठल्या नेत्याला संधी मिळते याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून आहे.

केंद्रात शिंदे गटाला दोन कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. मुंबई, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना संधी मिळू शकते असं बोललं जातं. यात राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. शिंदे गटाची भाजपला मदत व्हावी या हेतून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राहुल शेवाळेंना केंद्रीय मंत्रिपद देण्याची शक्यता आहे. श्रीरंग बारणे यांना मंत्रिपद देत पश्चिम महाराष्ट्रात शिंदे गटाला मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. यात विदर्भात प्रतापराव जाधव यांनाही मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

महाष्ट्रात सत्तातर झाल्यानंतर अनेक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार यावर चर्चा सुरु आहेत, अशात राज्याआधीच आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. उद्या (रविवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महाराष्ट्रातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत बैठक होणार असल्याचे समजते.