विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

0
380

भोसरी, दि.१४(पीसीबी) | विवाहितेच्या छळ प्रकरणी तिच्या पतीसह सासरच्या पाच जणांवर छळ, मारहाण आणि धमकी दिल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर २०२१ ते १४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत बालाजीनगर, भोसरी येथे घडला.

पती रमजान हमीद अत्तार (वय २७), सासरे हमीद अत्तार (वय ६०), दीर आमिर हमीद अत्तार (वय ३०), सासू आणि जाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या सासरच्या लोकांनी फिर्यादीकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. तसेच किरकोळ कारणावरून वारंवार त्रास देऊन, शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन क्रूर वागणूक दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.