बेरोजगारीचे तांडव, पोलिस भरतीसाठी डॉक्टर, इंजिनिअर, एमबीए, एमएस्सी झालेले तरुण

0
228

– १८ लाख तरुणांचे शिपाई पदासाठी अर्ज

पुणे, दि.१३ (पीसीबी) : देशात वाढत्या बेरोजगरीमुळे आता उच्च शिक्षित तरुणांही पोलिस भरतीसाठी नाव नोंदणी केली असून आपले भविष्य ते आजमावत आहेत. राज्यात तब्बल १८ लाख तरुणांनी शिपाई पदासाठी अर्ज केले आहेत.

देशात बेरोजगार तरुणांची संख्या मोठी आहे. अनेक तरुण हे उच्चशिक्षित असूनही ते बेकार आहेत. रोजगार मिळत नसल्याने मिळेल ते काम करण्यास ही तरुणाई तयार आहे. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात पोलिस भरती सुरू असून या भरतीत इंजिनियर, डॉक्टर, एमबीए, एमएस्सी झालेले तरुणही आपले नशीब आजमावत आहेत.

देशात तरुणाईला रोजगार देणे हे सरकार पुढचे मोठे आवाहन आहे. केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात तरूणांन रोजगार देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार अनेक सरकारी नोकऱ्यांसाठी तरुण आपले नशीब आजमावत आहे. राज्यात सध्या पोलिस भरती सुरू आहे. विविध जिल्हयात ही भरती प्रक्रिया सुरू आहे. पुणे शहरातही पोलीस भरती ३ जानेवारीपासून सुरु करण्यात आली आहे. या पोलिस भरतीत ७२० पोलीस शिपाई पदाकरिता तब्बल ६६ हजार १४२ अर्ज आले आहेत. असून ७५ चालक पदाकरिता सहा हजार ८४३ जणांचे अर्ज आले आहेत. यात इंजिनिअर, डाॅक्टर, एमबीए, एमएस्सी, बी-टेक, बीबीए, बीएसीएस, बीएस्सी शिक्षण घेतलेल्या उच्चशिक्षितांचे प्रमाण मोठे असल्याची माहिती पुढे आली आहे. उच्च शिक्षित तरुणांनी देखील अर्ज केल्याने भरती करणाऱ्या पोलीसांकडून ही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पुणे पोलीसांकडे भरतीसाठी आलेल्या उमेदवारात दोन हजार ३९० उच्चशिक्षित पदवीधर तरुण आहेत तर ८४८ जणांनी पदव्युत्तर पदवी संपादित केलेली आहे. यामध्ये एलएलएम (७ जण), एम.फार्म (३), एमबीए (२८१), एमसीए (४२), एमसीएस (३२), एम.ई. (८), एमएसडब्लूय (९८), एम.टेक (६), एमसीएम (३) अशा पदव्युुत्तर पदवी धारकांचा समावेश आहे. तर, बीई अभियंते (८७६), बी.फार्म (८५), बीबीए (२२२), बीसीए (५१५), बी.टेक (१७१), बीसीएस (३९४), बीएसडब्लयू (५८), बीसीएम (३०), बीएलएस- एलएलबी (१५), बीडीएस , बीएसएमस डाॅक्टरांचे प्रत्येकी दोन, बीएमएस नऊ अशा आदी पदवीधारकांनी देखील भरती साठी अर्ज केला आहे.