काळेवाडी, दिि. १२ (पीसीबी) – भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि. १०) मध्यरात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास तापकिरनगर, काळेवाडी येथे घडली.
ओमकार अशोक खुंटे (वय २१, रा. पिंपरी गाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच १४/जेएच ३९११ या कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खुंटे आणि त्यांचा मित्र अरबाज शेख (वय २३) यांच्यासह त्यांच्या दुचाकीवरून तापकिरनगर येथून जात होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या कारने फिर्यादींच्या दुचाकीला धडक दिली. त्यात खुंटे आणि शेख हे गंभीर जखमी झाले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.












































