गोवा मुक्तिसंग्रामला ६२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आय ए एस च्या ६२ सायकलपटुंची पुणे टू गोवा साडे चारशे किमी कोस्टल राईट

0
267

चिंचवड, दि.१० (पीसीबी) -भारतामधील गोवा राज्याच्या मुक्तिसंग्राम ला 62 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये भारतामध्ये उल्लेखनीय काम करणारी इंडो ऍथलेटिक्स सोसायटी या संस्थेने 65 सायकल स्वर पुणे ते गोवा अशी 4 दिवसाची गोवा स्वतंत्रता सायकल मोहीम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. शनीवारी दिनांक 3 फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजता उद्योजक अण्णा बिरादार , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता प्रकाश शेटबाळे , इंडो अथलेटिक्स सोसायटीचे गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ यांच्यातर्फे झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.

पुणे ते गोवा हे 465 किमी अंतर तीन दिवसात पार करण्यात केले. प्रवासाचा मार्ग खालील प्रमाणे राहणार होता
पुणे ते कराड – 185 किमी
कराड ते आजरा – 160 किमी
आजरा ते गोवा – 120 किमी

उंब्रज येथे सचिन निकम, संतोष बाबर, गौरव कारंडे, रणजीत शिंदे यांचा तर्फे नारळ पाणी देऊन सर्व सायकलिस्ट चे जोरदार स्वागत करण्यात आले कराड येथील हॉटेल भाग्यलक्ष्मी येते श्री तात्यासाहेब शेवाळे, अनिल जाधव(उपसरपंच),अनिल शिंदे, कुमार देसाई, सुरेश हजारे,संदीप सकट,कुणाल पवार,प्रताप इंगवले,सचिन शेवाळे, राजीव शिंदे विद्यानगर सैदापूर कराड यांच्यातर्फे सर्व सायकलिस्ट चे जोरदार स्वागत करण्यात आले. सैदापूर येथील सरपंच फत्तेसिंह जाधव यांनी कराड व परिसरातील अकरा मारुती व इतर असलेल्या ऐतिहासिक वारसा बद्दल माहिती घेण्यात आली. राईड मध्ये पुणे ,पिंपरी चिंचवड, मावळ तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून सायकल प्रेमींनी सहभाग घेतला होता. सर्व रायडर्स चारशे पासष्ट किलोमीटर पेक्षा जास्त अंतर सायकलिंग केली.प्रवासादरम्यान कोल्हापूर येथे महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर हॉटेल जयहिंद येथे वाहतूक परिवहन मंडळाचे अजित ताम्हणकर सर यांनी सर्वांना जेवणाची याची सोय केली होती, दुसऱ्या दिवशी आजरा येथे कृष्णकांत पाटील व संवेदना फाउंडेशनचे सदस्य उदय पाटील, अशोक सावंत ,रमेश देसाई यांनी संपूर्ण आजरा येथील सोय पाहिली , आजरा हे गाव छोटे असून देखील येथे सर्वांना राहण्यासाठी हॉटेल मध्ये मुक्काम आणी जेवण ची उत्कृष्ट सोय करण्यात आली होती, सावंतवाडी या ठिकाणी प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर , श्री अजित ताम्हणकर , श्री प्रशांत जाधव , श्री सचिन पोलादे , श्री अभय सामंत उद्योजक यांनी दुपारच्या जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था पाहिली , संपूर्ण प्रवासादरम्यान कात्रज, खंबाटकी, तवंडी , आंबोली तसेच बांदा येथील घाट हे सायकल स्वरांचे कसोटी पाहणारे होते असे संस्थापक सदस्य गजानन खैरे यांनी सांगितले.

तसेच गोवा येथे गोवा राज्याचे मंत्री सुभाष फळदेसाई तसेच पराग आचरेकर यांनी सर्वांचे स्वागत केले, महाराष्ट्रातून गोवा मुक्ती संग्राम साठी 60 वर्षांपूर्वी बऱ्याच जणांनी बलिदान दिले व आज पुणे येथून एवढी मोठी गाईड आयोजित करण्यात आल्याबद्दल त्यांनी सर्वांचे धन्यवाद व्यक्त केले.

पुणे ते गोवा राईडमध्ये इंडो अथलेटिक्स सोसायटीचे अविनाश चौगुले , हनुमंतराव शिंदे , मुकुंद उर्फ हेमंत दांगट पाटील, राहुल जाधव, रामदास अण्णा चौधरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडीसीकर ,श्रेयस पाटील , मदन शिंदे, दत्तात्रय आनंदकर,अजित गोरे , श्रीकांत चौधरी विशाल परदेशी, संदीप गायकवाड ,देवेंद्र मोरे ,सलमान शेख ,संतोष आवटे ,संजय साठे ,अनंत कुंभारे ,दीपक बुरुकुल, सोपान औटी, नारायण औटी, समीर पळशीकर, विजय शहा ,नंदकुमार नखाते ,बाळासाहेब तांबे ,संतोष नखाते ,अमित नखाते ,वैभव जी तांबे ,प्रशांत तायडे, शैलेश पाटील, स्वामीनाथन श्रीनिवासन, भूपेंद्र डेरवणकर ,अभिजीत रोडे ,प्रदीप टाके ,हेमंत पाटसकर, चिंतन देसाई, प्रशांत शिर्के, उद्योजक गिरीशजी परदेशी, जयजित गोसावी, संकेत उपळेकर, राहुलजी जाधव आदी सायकलस्वार सहभागी झाले होते. वेगवेगळ्या ठिकाणी तुषार भोईटे (सातारा), शितल बाबर (कोल्हापूर), संजय कोरे (कोल्हापूर) येथे सायकल दुरुस्त करण्या साठी मदत केली.

इंडो ऍथलेटिक सोसायटीने आजपर्यंत दहा वर्षांमध्ये शंभराहून अधिक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे घेतले आहेत यामध्ये भारताचा स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ७५ सायकलस्वारांनी पुणे ते कन्याकुमारी राईड केली , त्याच प्रमाणे भक्ती शक्ती सायक्लोथोन , घोरवडेश्वर बाईक अँड हाईक, पुणे टू पंढरपूर सायकल वारी, पुणे टू शिवनेरी दुर्गवारी, नवरात्री रन, पुणे टू गेट ऑफ इंडिया अशा विविध राईड यशस्वीपणे घेण्यात आले आहे, संस्थेला विविध स्थानिक स्वराज्य संस्थेचे बरेचसे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. खेळातून समाज प्रबोधन घडवण्यात संस्था नेहमीच पुढे करणे असते. आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये भारतामध्ये उल्लेखनीय कार्य करण्यात इंडो ऍथलेटिक्स सोसायटी संस्था नेहमीच अग्रगण्य स्तरावर राहिली आहे.