भोलेश्वराचे दर्शन घेवून चिंचवडेनगरमध्ये भाजपा उमेदवार आश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ पदाधिका-यांनी साधला नागरिकांशी संवाद

0
258

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) :- चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक प्रचारादरम्यान भारतीय जनता पार्टी+बाळासाहेबांची शिवसेना+आरपीआय (ए)+रासप+शिवसंग्राम संघटना+रयत क्रांती संघटना +प्रहार संघटना या महायुतीच्या अधिकृत उमेदवार अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ चिंचवडेनगर प्रभागातील भोलेश्वराचे दर्शन घेवून प्रचाराला सुरूवात करण्यात आली. भोलेश्वर मंदिरात प्रचार पत्रिका अर्पण करून परिसरातील नागरिकांची भेट घेत प्रचार पत्रिकेचे वाटप करून पदाधिका-यांनी नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेवराव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, भाजपा शहर उपाध्यक्ष शेखर चिंचवडे, राजाभाऊ चिंचवडे, भगवान निकम, कैलास रोटे, प्रदीप नेहते, धिरज धाडक, माऊली जगताप, मयुर चिंचवडे, योगेश महाजन, पिंटू चिंचवडे, हेमंत ढाके, एकनाथ सरोदे, मनोज पाटील, जिवन वायकोडे तसेच भाजपा आणि मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

माजी पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले की, दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊंनी चिंचवड मतदारसंघात अनेक लोकपयोगी विकासकामे केली आहेत. नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या असून यातूनच त्यांनी आदर्श लोकाभिमुख नेतृत्वाचा वस्तुपाठ घालून दिला. तोच वारसा आज अश्विनीताई जगताप पुढे घेऊन जात आहे. नागरिकांचा हाच विश्वास जपण्यास आम्ही कायम कर्तव्यतत्पर राहणार आहे. त्यास नागरिकांकडून मोठया प्रमाणात पाठींबा मिळत आहे.

माजी महापौर शेखर चिंचवडे म्हणाले की, दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या नेतृत्वात भाजपाने शहरामध्ये विविध लोकोपयोगी प्रकल्प राबविलेले आहे. त्याचा नक्कीच नागरिकांना फायदा होत असून त्यांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी भाजपा उमेदवार श्रीमती ‍आश्विनीताई जगताप यांना नागरिकांकडून भरभरुन पाठींबा मिळत आहे. घरोघरी जावून नागरिकांशी संवाद साधत असून त्यास प्रतिसाद मिळत आहे.

शेखर चिंचवडे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराचा दुरदृष्टीचा विकास साधायचा असेल तर श्रीमती आश्विनीताई जगताप यांचा विजय आवश्यक आहे. त्यासाठी मतदारासोबत संवाद साधून ठिकठिकाणी बैठका घेण्यात येत आहेत. नागरिक देखील स्वत: बैठकांसाठी पुढाकार घेत असून विजय नक्कीच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.