वाहन दुरुस्ती कार्यशाळा विभागाऐवजी आता यांत्रिकी विभाग

0
338

पिंपरी, दि.९ ( पीसीबी) – महापालिकेच्या सेवा नियमांमध्ये बदल करण्यात आला असून त्यानुसार वाहन दुरुस्ती कार्यशाळा विभागाऐवजी यांत्रिकी विभाग असे नामकरण करण्यात आले आहे. याबाबत आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी काढला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंमलात असलेले सध्याचे सर्व सेवा प्रवेश नियम तसेच त्या संबंधात यापूर्वी करण्यात आलेले ठराव व आदेश यांचे अधिक्रमण करुन तसेच पालिकेमधील विविध करावयाच्या नियुक्त्‌यांचे नियमन व सेवांचे वर्गीकरण करण्यासाठी सुधारित नियमांना महाराष्ट्र शासनाने 2020 मध्ये मंजुरी दिली आहे. महापालिककेच्या कामकाजाच्या दृष्टीने वाहन दुरुस्ती कार्यशाळा विभाग ऐवजी यांत्रिकी विभाग असे संबोधन्यास आयुक्त सिंह यांनी मान्यता दिली आहे. तसेच याची महापालिकेच्या सर्व दप्तरी नोंद करण्यासही त्यांनी मान्यता दिली आहे.