चंद्रकांतदादावर शाई फेकली, माझ्यावर रॉकेल ओततील…

0
236

पुणे, दि. ८ (पीसीबी) – बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी मंगळवारी कसबा पेठ मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला, आणि आज त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर बिचुकले यांच्याकडून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी बिचुकले यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अर्ज मागे घे आणि पुणे सोडून जा आशा धमक्या येत असल्याचा बिचुकले यांचा आरोप आहे. यानंतर अभिजीत बिचुकले यांनी थेट निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून मला ज्याने धमकी दिली, माझ्यावर जो हल्ला करणार आहे त्याचा पोलिसांनी तपास करावा अशी मागणी केली आहे.

अभिजित बिचुकले माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी निवडणूक आयोगाला पत्र दिलं आहे की राज्याचे जे गोपनीय खाते जे आहे त्यांनी या प्रकाराचा तपास करावा, मी उद्धव ठाकरे यांच्या मुलाच्या विरोधात उभं राहिलो तरी मला धमकी आली नाही. मला धमकी देणार हा कुत्रा कोण आहे याचा शोध पोलिसांनी घ्यावा. तर पुढं म्हणाले चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकली उद्या माझ्या अंगावर रॉकेल टाकतील.अशी प्रतिक्रिया अभिजित बिचुकले यांनी दिली.