रिक्षा घेण्याच्या वादात मित्राच्या डोक्यात घातला दगड

0
248

देहूरोड, दि.८ (पीसीबी) – दोघे मित्र कामावरून घरी जात असताना रस्त्यात त्यांच्यात रिक्षा घेण्यावरून भांडण झाले. यातूनच एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात दगड मारून मित्राला गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. ६) सायंकाळी आर्मी सीओडी डेपो जवळ, देहूरोड येथे घडली.

रमेश सोनबा मेटकरी (वय ३४, रा. आदर्शनगर, किवळे) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनंत लक्ष्मण झिंबल (वय ३४, रा. आदर्शनगर, किवळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मेटकरी आणि त्यांचा मित्र अनंत हे पेंटिंगचे काम संपवून मेटकरी यांच्या दुचाकीवरून घरी जात होते. आर्मी एरिया सीओडी डेपो जवळ आल्यानंतर ते रस्त्याच्या बाजूला थांबले. तिथे रिक्षा घेण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्या वादातून अनंत याने रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड मेटकरी यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.