दिघी, चाकण मधून दोन दुचाकी चोरीला

0
260

चाकण, दि. ८ (पीसीबी) – दिघी मधून होंडा शाईन तर चाकण मधून होंडा स्प्लेंडर दुचाकी चोरीला गेल्या. याप्रकरणी मंगळवारी (दि. ७) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अंकुश फकिरा कांबळे (वय २४, रा. चक्रपाणी वसाहत भोसरी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांबळे यांनी त्यांची ३० हजार रुपये किमतीची होंडा शाईन दुचाकी वडमुखवाडी येथील साई मंदिरासमोर पार्क केली. तिथून त्यांची दुचाकी चोरीला गेली. हा प्रकार ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता अवघ्या वीस मिनिटात घडला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

प्रवीण जानकू दौंडकर (वय २८, रा. शेल पिंपळगाव, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दौंडकर यांनी त्यांची १० हजार रुपये किमतीची होंडा स्प्लेंडर दुचाकी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. घरासमोरून अज्ञातांनी दौंडकर यांची दुचाकी चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.