महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत, पुणे-बारामती संघाला संयुक्त अजिंक्यपद

0
217

पुणे, दि. ७ (पीसीबी): महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत पुणे-बारामती परिमंडल संघ आणि नागपूर-चंद्रपूर-गोंदिया परिमंडल संघाने संयुक्तपणे सर्वसाधारण अजिंक्यपदाचा मान पटकावला. पुणे-बारामती परिमंडल संघातील खेळाडूंनी वैयक्तिक व सांघिक खेळ प्रकारात नेत्रदिपक कामगिरी करीत अटीतटीच्या क्रीडास्पर्धेत प्रथमच सर्वसाधारण विजेतेपद मिळवले आहे.

जळगाव येथील एकलव्य क्रीडा संकुलामध्ये महावितरणच्या राज्यस्तरीय स्पर्धेचा रविवारी (दि. ५) सायंकाळी समारोप झाला. यावेळी कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. चंद्रकांत डांगे यांच्याहस्ते पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी संयुक्त अजिंक्यपदाचा करंडक स्वीकारला. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, कार्यकारी संचालक (वितरण/मानव संसाधन) श्री. अरविंद भादीकर, स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता कैलास हुमणे (जळगाव), भुजंग खंदारे (मुख्यालय), मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) राजेंद्र पांडे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

महावितरणच्या चार दिवसीय क्रीडास्पर्धेत पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांच्या मार्गदर्शनात तसेच मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार (पुणे) व श्री. सुनील पावडे (बारामती) यांच्या नेतृत्वात पुणे-बारामती संघाने यंदा क्रीडा स्पर्धेसाठी कसून तयारी करण्यात आली. खेळाडूंना प्रशिक्षण देणे, सराव शिबिर आदींचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडास्पर्धेचे समन्वयक तसेच उपमुख्य औद्योगिक अधिकारी श्री. शिरीष काटकर (पुणे) व श्री. श्रीकृष्ण वायदंडे (बारामती) यांनी खेळाडूंची निवड चाचणी, सराव, प्रशिक्षण शिबिर आदींसाठी महत्वाचे योगदान दिले तर महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. अभय चौधरी यांनी संघप्रमुख म्हणून काम पाहिले. राज्यातील १६ परिमंडलांच्या ८ संयुक्त संघांतील ७३० पुरुष व ३५३ महिला असे एकूण १०८३ खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते.

पुणे-बारामती परिमंडल संघाने सांघिक खेळात क्रिकेट, खोखो (पुरुष), बॅडमिंटन (महिला) स्पर्धेत विजेतेपद मिळविले तर कबड्डी (महिला) व कॅरम (पुरुष) मध्ये उपविजेता ठरले. वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये पुणे-बारातमी संघाचे विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे- धावणे १०० मीटर (पुरुष)- गुलाबसिंग वसावे (उपविजेता), २०० मीटर (पुरुष)- गुलाबसिंग वसावे (विजेता), ८०० मीटर (पुरुष)- प्रतीक वाईकर (विजेता), १५०० मीटर (पुरुष)- प्रतीक वाईकर (विजेता), महिला गट- अर्चना भोंग (विजेती), ४ बाय १०० रिले (पुरुष)- प्रतीक वाईकर, सोमनाथ कांतीकर, कृष्णा लाड, गुलाबसिंग वसावे (उपविजेता), महिला गट- सुप्रिया लुंगसे, अर्चना भोंग, शर्वरी तिवटणे, माया येळवंडे (उपविजेता), गोळा फेक (पुरुष)- प्रवीण बोरावके (विजेता), थाळी फेक (पुरुष)- प्रवीण बोरावके (विजेता), लांब उडी (पुरुष)- सोमनाथ कांतीकर (विजेता), महिला गट- माया येळवंडे (उपविजेती), बुद्धीबळ (पुरुष)- अजय पंडित (विजेता) टेनिक्वाईट- (महिला दुहेरी)- शीतल नाईक, कोमल सुरवसे (विजेते), बॅडमिंटन महिला एकेरी- वैष्णवी गांगरकर (विजेती), पुरुष दुहेरी- इम्रान तासगावकर व गणेश काकडे (उपविजेता), कुस्ती ५७ किलो- आकाश लिंभोरे (विजेता), ६५ किलो- राजकुमार काळे (विजेता), ७४ किलो- अकील मुजावर (उपविजेता), ८६ किलो- अमोल गवळी (विजेता), ९२ किलो- वैभव पवार (विजेता)