नाना काटे महाआघाडीचे उमेदवार

0
328

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – चिंचवड पोटनिवडणुकिसाठी महाआघाडीची उमेदवारी नाना काटे यांना जाहीर कऱण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यासंदर्भातील ट्वीट नुकतेच केले आहे. राज्याचे विधानसभा विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत काटे हे सकाळी आपला उमेदवारी अर्ज दाखल कऱणार आहेत. आता भाजपकडून अश्विनी जगताप आणि राष्ट्रवादीचे नाना काटे यांच्यात दुरंगी लढत होणार असे चित्र आहे. शिवसेनेचे इच्छुक उमेदवार राहुल कलाटे यांना महाआघाडीतून उमेदवारी देण्याच्या विषयावर पडदा पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नऊ इच्छुकांनी आयात उमेदवार नको, असे ठामपणे सांगितल्याने अखेर अजित पवार यांनी काटे यांचे नाव निश्चित केले आहे.

नानान काटे हे पिंपळे सौदागर प्रभागातून दोन वेळा राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणून निवडूण आले होते. पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून तसेच महापालिकेत विरोधीनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. २०१४ मध्ये भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या वतीने काटे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य घेतले होते. आता जगताप यांच्या पत्नी अश्विनी यांच्या विरोधात सहानुभूतीच्या लाटेला ते कसा छेद देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. काटे यांनी गेल्या दहा दिवसांपासून सोशल मीडियातून प्रचारा सुरू केला आहे.