पुरुषाने दिला बाळाला जन्म, स्तनपानसुध्दा केले

0
307

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) : जगात एक समज आहे जो वर्षांनूवर्ष चालत आला आहे. एक महिला हीच आई होऊ शकते, तिच बाळाला जन्म देऊन तिला छातीला लावून स्तनपान करु शकते. मातृत्व आणि स्त्रीत्व यात खूप मोठा फरक आहे. पण याबाबत आजही समाज अनेक गैरसमज आहेत. एक महिला आई होती आणि तिच्यामध्ये मातृत्वाच्या भावना असतात. आपण अनेक वेळा ऐकलं आहे, एक स्त्री म्हटलं की तिच्यामध्ये मातृत्त्वाची भावना असते, असा समज वर्षानुवर्ष लोकांनाच्या मनात कायम आहे.

कोण म्हणतं आईच जन्मदाती असते!

आई होण्याचं सुख आणि वेदना कायम महिलांनाच सोसाव्या लागतात. महिला अनेक वेळा म्हणता एकदा आई होऊ तर बघा मग कळेल तुम्हाला काय त्रास होतो ते…बाप होणं सोपं आहे पण आई म्हणजे दुसरा जन्म…तुम्हाला वेड फेम रितेश देशमुखचा मिस्टर मम्मी चित्रपट आठवतो. या चित्रपटात रितेश देशमुख हा प्रेग्नेट होतो. पण हा झाला चित्रपटाचा भाग..पण जर आम्ही तुम्हाला असा पुरुषाचा व्हिडीओ दाखवला ज्यात त्याने आपल्या बाळा जन्म दिला आहे. एवढंच नाही तर तो त्या बाळाला छातीला लावून स्तनपान करताना दिसतं आहे. बसला ना धक्का…

बापमाणूस!

ही कथा आहे 31 वर्षीय टॅनियस पोसेची. खरं या टॅनियसचा जन्म स्त्री म्हणून झाला होता. 6 वर्षांपूर्वी ट्रान्सजेंडर सहकाऱ्याच्या मदतीने त्याला कळलं त्याला पुरुषाच्या भावना आहेत. मग त्याने वैद्यकीय संक्रमणास सुरुवात केली आणि उपचार सुरु केले. पण अचानक एक दिवस 2021 मध्ये कळलं ती गरोदर आहे. तिलाही धक्का बसला. पण टॅनिअसने या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. आज हे बाळ ज्याचं नाव जेनिअस आता एक वर्षाचा झाला आहे.

ऐकावं ते नवलंच!

टॅनियसला सीहॉर्स डॅड म्हणूनही ओळखलं जातं. सीहॉर्स हा असा जीव आहे, ज्यामध्ये नर प्रजाती देखील गर्भवती होऊ शकतात. टॅनियसने सोशल मीडियावर आपल्या बाळाच्या जन्माबद्दलची कहाणी शेअर केली आहे. त्यानंतर या व्हिडीओला आतापर्यंत 10 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. दरम्यान काही लोक टॅनिअसवर खूप टीका करतात. या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी लोकांच्या टीकेबद्दल सांगितलं. टॅनिअस म्हणतो की, लोक त्याला दुसऱ्या ग्रहाचा माणूस म्हणतात. तर कोणी म्हणतात की, तो बाळाला स्तनपान करण्यासाठी हार्मोन्स घेतो.