काँग्रेसची उमेदवारी टिळकांच्या घरात ? कसब्यातील पोटनिवडणुकित नवा ट्विस्ट

0
184

पुणे, दि. ५ (पीसीबी) – अटीतटीच्या शिक्षक-पदवीधर विधान परिषद निवडणुकांनंतर, पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागून आहे. कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने उमेदवार जाहीर केले आहे.

मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीकडून उमेदवार अजून ही निश्चित झाले नाहीत. महाविकास आघाडीकडून चिंचवड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी लढणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र या जागेवर अजून ही शिवसेना आग्रही आहे. मविआच्या चर्चेनंतर कसब्याची जागा काँग्रेस लढणार हे जाहीर झालं आहे. मात्र काँग्रेसने अजून पर्यंत उमेदवार जाहीर केला नाही. मात्र आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्याच्या काँग्रेस भवनात एक बैठक बोलावली आहे.

काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांचे नाव आघाडीवर आहे. पण काँग्रेस नवा खेळ खेळण्याच्या तयारीत आहे. भाजपने टिळक परिवारातील उमेदवार न दिल्याने काँग्रेस रोहित टिळक यांना उमेदवारी मिळू शकते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. मात्र टिळकांना उमेदवारी दिली तर काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसची कोंडी होणार हे नक्की.