मोठी भविष्यवाणी, … २०२४ मध्ये पुन्हा मोदीच पंतप्रधान

0
319

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) : सत्ताधारी भाजप आणि कॉंग्रेससह इतर पक्षांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. लोकसभी निवडणुकीली एक वर्षापेक्षा कमी कालावधी राहिला. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक 418 जागा जिंकत पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर विराजमान होतील. मोदी त्यांना विरोधकांच्या विरोधाचा प्रचंड सामना करावा लागेल, पण राष्ट्रवाद आणि आंतकवादाच्या मुद्यावर ते भाजपला मोठे यश मिळवून देतील, अशी भविष्यावाणी एका ज्योतिषांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धामचे पीठधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे खूपच व्हायरल होत आहेत. धीरेंद्र शास्त्री यांचे गुरू स्वामी रामभद्राचार्य आहेत. या दरम्यान निवडणूकीतील राजयोग या विषयावर जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भविष्यवाणी केली आहे. तसेच जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी मोदी सरकारने कोणती मोठी कामे करायची आहेत हेही सांगितले. जगद्गुरु रामभद्राचार्य म्हणाले की, माझ्या आज्ञेत राम मंदिर बांधले गेले. तसेच पीएम नरेंद्र मोदी तिसऱ्यांदाही निवडणू येणार आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या कुंडलीत राजयोग आहे, त्यामुळे अनेक विरोधक तयार होऊन देखील त्यावर ते मात करण्यात यशस्वी होतील. येणारी लोकसभेच्या निवडणुकीत आतंकवाद हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे. राष्ट्रवाद आणि आतंकवाद या भोवती 2024 च्या निवडणुकीचा प्रचार राहील आणि त्यात भाजप तब्बल 418 जागा जिंकेल. पण पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पुर्ण होण्याआधी मोदी 2028 मध्येच दुसऱ्याकडे जबाबदारी देतील, असे भाकित यांनी केले आहे.