अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

0
568

भोसरी, दि. ४ (पीसीबी) – प्रेमाचा बहाणा करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. यात मुलगी गरोदर राहिली. हा प्रकार नोव्हेंबर २०२२ मध्ये भोसरी गावठाणात घडला.

याप्रकरणी पीडित मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार छोटू (वय २२, रा. बिहार) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलीची आणि आरोपीची नोव्हेंबर २०२२ मध्ये ओळख झाली. ओळखीचा गैरफायदा घेऊन आरोपीने मुलीला त्याच्या खोलीत नेऊन तिच्यावर प्रेम असल्याचा बहाणा करून लैंगिक अत्याचार केला. त्यामध्ये मुलगी गरोदर राहिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.